उद्या शनिवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
कणकवली :
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भेट देत त्यांचे आशीर्वाद घेतले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्यापूर्वी घेतलेला हा आशीर्वाद नलावडे यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी नलावडे शनिवारी शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधीच शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांनी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली.
कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधूमाळी सुरू झाली असून भाजपने स्वयंभू मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी घराघरांत जाऊन जनसंपर्क मोहिमेला वेग दिला आहे.
पक्ष मोर्चेबांधणी, उमेदवारी हालचाली आणि सततची भेटीगाठी यामुळे कणकवलीत राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
