You are currently viewing कणकवली नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे उद्या अर्ज दाखल करणार

कणकवली नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे उद्या अर्ज दाखल करणार

कणकवली नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे उद्या अर्ज दाखल करणार

कणकवली

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढत असून भाजपने आपल्या उमेदवारी प्रक्रियेला वेग दिला आहे. गतवेळचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे उद्या (शनिवार) नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपने नुकत्याच घेतलेल्या मुलाखतींमध्ये कणकवली नगराध्यक्षपदासाठी नलावडे यांच्याशिवाय अन्य कोणतीही उमेदवारी पुढे आली नाही. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून त्यांची उमेदवारी अधिकृतरीत्या निश्चित झालेली आहे. उद्या ते अर्ज दाखल करताच निवडणूक प्रचारात आणखी एक टप्पा गाठला जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा