दिव्यांग तक्रार निवारण समितीची सभा १७ नोव्हेंबरला
सिंधुदुर्गनगरी
ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करुन दर महिन्याला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता ही सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स (व्ही.सी.) द्वारे आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी या सभेसाठी आपल्या नजिकच्या पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी केले आहे.

