मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद
सिंधुदुर्गनगरी
नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक विडणूक 2025 साठी कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत, मालवण नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर दिनांक 3 डिसेंबर रोजी मततोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदानाच्या दिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याकरीता मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील खाली नमूद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निर्गमित केल आहे. तसेच या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे.
| अ.क्र | तालुका | दि.2/12/2025 रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद करण्याचे नगरपरिषद/ नगरपंचायत नाव |
| 1 | सावंतवाडी | सावंतवाडी नगरपरिषद |
| 4 | कणकवली | कणकवली नगरपंचायत |
