भोसले सैनिक स्कूलचे उद्या भव्य भूमिपूजन
सावंतवाडी :
कोकणातील पहिल्या सैनिक स्कूलच्या रूपाने उभारण्यात येत असलेल्या भोसले सैनिक स्कूल (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल) चा भव्यदिव्य भूमिपूजन व उद्घाटन सोहळा उद्या शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी, चराठे (वझरवाडी), ता. सावंतवाडी येथे ऐतिहासिक दिमाखात पार पडणार आहे.
श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून होत असलेला हा भव्य प्रकल्प संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त असल्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांसाठी सैनिक प्रशिक्षणासोबत दर्जेदार, शिस्तबद्ध व एकात्मिक शिक्षणाची नवी दारे खुली करणारा ठरणार आहे.
या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, डॉ. अरविंद कुडतरकर (मा. जिल्हा संघ चालक – रा. स्व. संघ, सिंधुदुर्ग), नीरज चौधरकर (प्रांत संघटन मंत्री – अ. भा. वि. प. कोकण), ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर (उपाध्यक्ष – अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद), मेजर विनय देगावकर (अध्यक्ष – अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, कोकण प्रांत) यांसारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व नागरिक, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व निमंत्रक कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड. सौ. अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई यांनी केले आहे.
हाच सोहळा कोकणात सैनिक सुसंस्कारांच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल.

