You are currently viewing सावंतवाडीतील आशिष सुभेदार यांची युवासेना तालुकाप्रमुख पदी नियुक्ती

सावंतवाडीतील आशिष सुभेदार यांची युवासेना तालुकाप्रमुख पदी नियुक्ती

सावंतवाडीतील आशिष सुभेदार यांची युवासेना तालुकाप्रमुख पदी नियुक्ती

सावंतवाडी :

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने सावंतवाडी शहर प्रवक्ते आशीष सुभेदार यांना सावंतवाडी तालुका युवासेना तालुकाप्रमुख या महत्वाच्या पदाची जबाबदारी सोपवली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या अर्जभरण कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, उपनेत्या जान्हवी सावंत, संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर, जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट व महिला जिल्हाध्यक्ष श्रेया परब यांच्या एकमताने ही नियुक्ती करण्यात आली.

आशीष सुभेदार यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या सक्रिय व संघटनात्मक कार्याचा विचार करून पक्षाने ही महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत तालुक्यातील युवासेना संघटनाचा विस्तार करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सुभेदार यांनी सांगितले. वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा