You are currently viewing सांभाळायचे आता वळू

सांभाळायचे आता वळू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सांभाळायचे आता वळू*

 

लोकशाहीचे पवित्र पटावर

आता उधळणार किती वळू

पारखून घ्या निरखून घ्या

तरी मारतील शिंग *हळू*

 

खेड्यामधले हेच *राजे*

दाबून टाकतील मांडीखाली

काढाल जर का विरुद्ध ब्र

गणपती निघतील कानाखाली

 

खेड्यावरचा धुरळाच फार

डोक्यात जाऊन करी बेजार

कार्यक्रम होतो *समृद्धीवर*

बंद असताना गाव शिवार

 

नफ्यात असतो छोटा वाटा

बारमधे बसता होतो बोभाटा

सीसीटीव्हीचे बारीक *लक्ष*

अलगद टीपते क्षणात काटा

 

गावोगावचे *वळू* उधळता

लक्ष असावे बारीक आपले

पाहिले जरी काही *वेगळे*

उचकाचे नाही तोंड “शिवले”

 

राज्य भराचा वळू बाजार

ठरवणार भविष्य शहाण्यांचे

गुमान दाबून *कळ यंत्राची*

गांधी खिशात हळुच घालायचे

 

विनायक जोशी🙏🏻 ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा