You are currently viewing कणकवली नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल

कणकवली नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल

कणकवली नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल

राणेंच्या विचारांचा नगराध्यक्ष येणार – समीर नलावडे

कणकवली :
कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपने श्री देव स्वयंभूच्या चरणी श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला. या वेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले की, “या निवडणुकीत राणेंच्या विचारांचा नगराध्यक्ष आणि त्यांच्या विचारांचे नगरसेवक निवडून येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला गणेश (बंडू) हर्णे, विठ्ठल देसाई, अबिद नाईक, राजश्री धुमाळे, अण्णा कोदे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. स्वयंभू मंदिरात पूजा-अर्चा केल्यानंतर श्री देव रवळनाथ, प. पू. भालचंद्र महाराज व पटकीदेवीचे दर्शन घेऊन भाजपने प्रचाराला सुरूवात केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा