वेंगुर्ला
वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी सादर केलेल्या राजीनामा अर्ज संभ्रम निर्माण करणारा असल्याने जि. प. अध्यक्ष समिधा नाईक यांनी तो राजीनामा नामंजूर केला. याविषयी आज झालेल्या वेंगुर्ले प. स. मासिक सभेच्या सुरुवातीलाच या विषयावरून शिवसेनेच्या सदस्यांमध्ये तू तू मै मै झाली. परंतु हा विषय जिल्हा पातळीवरचा असल्याने यावर आपण भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट सांगून सभापती सौ. कांबळी यांनी हि सभा खेळीमेळीच्या वातावरणात चालवली.