You are currently viewing वीज वितरणच्या विरोधात वेतोरे ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण….

वीज वितरणच्या विरोधात वेतोरे ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण….

ओरोस
कुडाळ दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने दमदाटी करून व पोलीस मदतीच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे जबरदस्तीने नवीन ११ केव्ही ची विद्युत लाईन घालण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे व घराना बागायतीना धोका निर्माण झाला आहे. तरी संबंधित विद्युत लाईन जुन्या विद्युत लाईन वरून न्यावी या मागणीसाठी वेतोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
कुडाळ दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने नवीन ११ केव्ही ची विद्युत लाईन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे घालण्यात येत आहे. सदरच्या विद्युत लाइनच्या लगत रहिवाशी घरे,प्राथमिक शाळा, मंदिरे, शेती आणि बागायती असल्याने स्थानिक ग्रामस्थांचा या विद्युत लाईन करिता विरोध आहे. संबंधित विद्युत लाईन जास्त क्षमतेची व अतिशय धोकादायक असल्याने ती घरांपासून तसेच प्राथमिक शाळा,मंदिरे, यापासून लांब असावी. हे काम करत असताना जमीन भागधारकांना व ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता हे काम अनधिकृतपणे चालू आहे. संबंधित कामाचा सर्वे करताना लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीला कोणतीही कल्पना दिलेली नाही. हे काम पोलिस बळाचा वापर करून दमदाटी ने केले जात आहे. कामाचा कुठलाही आराखडा नसताना, कुठलेही पत्रक नसताना, जिथे वाटेल तिथे पोल उभे करून ११ केव्ही विद्युत लाईनचे काम केले जात आहे नवीन उच्चदाब विद्युत वाहिनी पोला वरून न नेता ती भूमिगत न्यावी. अशी लोकांची मागणी असून स्थानिकांची मागणी आहे याबाबत अनेक वेळा जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र त्यावर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने वेतोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. याला जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी पालकरवाडी सरपंच संदीप चिंचकर, वरची वाडी सरपंच राधिका गावडे, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, पालकरवाडी ग्रामपंचायत सदस्य बंड्या पाटील, गजानन धुरी, सुशांत नाईक, सोनल गावडे, यांच्यासह खानोली, वेतोरे पालकरवाडी ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा