“कु.निशिगंधा नाणेकर,C.A परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल,मानवी हक्क व संरक्षण जागृतीचे खेड तालुका अध्यक्ष श्री.शंकर नाणेकर यांच्या हस्ते सत्कार.
सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या सी.ए.फायनल परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होवून हे घवघवीत यश मिळविले.मोबाईलपासून दूर राहुन सतत 10 ते 12 तास सातत्याने अभ्यास करून हे यश संपादन केले.त्याबद्दल कु.निशिगंधा नाथाराम नाणेकरचे मानवी हक्क व संरक्षण जागृतीचे खेड तालुका अध्यक्ष शंकर नाणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तिला अभ्यासाबरोबर योगा,चित्रकला,रांगोळी व मेहंदीची विशेष आवड आहे.श्री.नाथारामनाणेकर वडील राजगुरुनगर येथे सहकारी बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून राजगुरुनगर हेड ऑफीस मध्ये कर्ज विभागात कार्यरत आहेत.तर,आई सुगंधा नाथाराम नाणेकर या गृहीणी आहेत.
कु.निशिगंधा नाथाराम नाणेकर हिचे 1 ली ते 10 वी पर्यंतच शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या,विद्यानिकेतन स्कुल,चाकण येथे झाले.तेव्हा एस.एस.सी परिक्षेत 93.40% गुण मिळवुन शाळेत प्रथम आली.तिने 11 वी,12 वी कॉमर्स राजगुरुनगर महाविद्यालय,राजगुरुनगर येथे पूर्ण केले.एच.एस.सी.(कॉमर्स) मध्ये 84% गुण मिळविले.त्यानंतर तिने C.A परिक्षेची तयारी सुरु केली आणि C.A Foundation ची परीक्षा उत्तीर्ण केली.त्याबरोबर B.com चे शिक्षण चाकण आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चाकण येथे सुरु ठेवले.B.com मध्ये फर्स्ट क्लास विथ डिस्टींक्शन (first class with distinction) उत्तीर्ण याचबरोबर M.B.A च शिक्षणही First class with Distinction ने पूर्ण केले.
राजगुरुनगर तालुक्यामध्ये सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येत आहे
