*कुडाळ–मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी निधी; आमदार निलेश राणेंचा ‘आदर्श मतदारसंघ’ संकल्प*
आंबडोस / मालवण :
कुडाळ–मालवण मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असून, मंत्रालय आणि विधानसभा स्तरावर राणे आडनावामुळे हा निधी सहज उपलब्ध होत आहे. या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून तो राज्यातील ‘आदर्श मतदारसंघ’ बनवण्याचा संकल्प आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
आंबडोस गावचे माजी सरपंच आणि उबाठा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप सीताराम परब यांनी अनेक सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमात आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री देव रवळनाथ मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच सुबोधिनी परब, माजी सरपंच विष्णू परब, उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दिपक पाटकर, जेष्ठ पदाधिकारी बाळू कुबल, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सचिव राहुल बागवे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, अभि लाड, माजी सरपंच वरवडेकर, नांदरुख सरपंच भाऊ चव्हण, श्याम वाक्कर, धोंडी नाईक, युवासेना विभागप्रमुख विशाल धुरी, पशा नाईक आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जनार्दन नाईक, सुरेश परब, चंद्रकांत परब, सुलोचना राणे, सुधा परब, प्रणाली चव्हाण, पूजा परब आदींचा सत्कार करण्यात आला.
दत्ता सामंत म्हणाले की, “आंबडोस हा राणे कुटुंबाचा निष्ठावंत गाव असून १९९० पासून आम्हाला १०० टक्के मताधिक्य देत आला आहे. या गावच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. या गावाच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत २५ लाखांचा निधी मंजूर केला जाणार आहे.” आमदार राणे मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहेत. बाळू कुबल यांनी निलेश राणे यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
माजी सरपंच दिलीप परब म्हणाले, “आम्ही राणे साहेबांचीच माणसं आहोत. काही गैरसमजातून दूर झालो होतो, पण आता पुन्हा एकत्र आलो, ही आनंदाची बाब आहे.”
या प्रसंगी दिलीप परब यांच्यासोबत विजय नाईक, दीपलक्ष्मी परब, नारायण परब, आनंद साळगावकर, दीपक नके, दीपका नके, अजिंक्य परब, निवृत्ती परब, शैलेश कदम, सत्यवान साळगावकर, प्रकाश दळवी, सायली साळगावकर, निकिता परब, आरती परब, हर्षदा परब, अनिकेत करावडे, शांताराम साळगावकर, विश्वनाथ करावडे, दर्शना करावडे, गुरुनाथ परब, दत्ताराम परब, कृष्णाजी करावडे, एकनाथ नाईक, भरत बुठ्ठे, जनार्दन नाईक, विवेक सावंत, अमित राणे, विनायक सावंत, दयानंद पाटकर, मंगेश नाईक, पुजा कदम, प्रणाली चव्हाण, पूर्णानंद कदम, सखाराम नाईक, जयश्री नाईक, राजश्री नाईक, नवनाथ परब, सुलोचना साबाजी परब, साबाजी परब, पुंडलिक परब, दिपक परब, प्रकाश परब, संगीता करावडे, रुपाली परब, ममता नाईक, संदेश परब, विनोद परब, ओंकार परब, राजश्री परब यांसह शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या मोठ्या प्रवेशाने आंबडोस गाव पुन्हा एकदा राणे परिवाराच्या नेतृत्वाभोवती एकवटले आहे.
