You are currently viewing कणकवली नगरपंचायतसाठी पहिल्या दोन दिवसांत एकही अर्ज दाखल नाही – तहसीलदार दीक्षित देशपांडे

कणकवली नगरपंचायतसाठी पहिल्या दोन दिवसांत एकही अर्ज दाखल नाही – तहसीलदार दीक्षित देशपांडे

१७ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशन स्वीकृती

कणकवली :

कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या दोन दिवसांत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षित देशपांडे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण १७ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून थेट निवड केली जाणार आहे. कणकवली तहसीलदार कार्यालयात हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार असून आजपासून ते १७ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत.

नामनिर्देशन दाखल करण्यासाठी ७ दिवसांची कालमर्यादा असून त्यामध्ये शनिवारी, १५ नोव्हेंबर रोजीदेखील नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. मात्र रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाही. १७ नोव्हेंबर हा नामनिर्देशन सादर करण्याचा शेवटचा दिवस असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा