१९४ लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी; तज्ञ डॉक्टरांच्या टीमने दिले मार्गदर्शन व उपचार
सावंतवाडी :
दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे दिव्यांग बांधवांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा एकूण १९४ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एसबीआय ब्रांच मॅनेजर श्री. पराग जाधव यांनी भूषविले. दिव्यांग माऊली कर्णबधिर विद्यालय व माऊली मतिमंद विद्यालय, शिरोडा यांच्या संस्थाचालिका श्रीमती रेखा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून दिव्यांगांच्या सेवेसाठी आयोजित उपक्रमाचे स्वागत केले.
या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. यामध्ये डॉ. निखिल अवधूत (अस्थिरोग तज्ञ), डॉ. बाळासाहेब जोशी (नेत्र शल्यचिकित्सक), डॉ. शाम राणे (कान-नाक-घसा तज्ञ), डॉ. रेश्मा भाईप (मानसोपचार तज्ञ), डॉ. संगीता टिपरसे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. योगिता शिंदे (फिजिओथेरपिस्ट), श्री. श्रीधर पवार (स्पीच थेरपिस्ट) यांनी दिव्यांग बांधवांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन व उपचार दिले.
शिबिरावेळी डॉ. ज्ञानेश्वर शेवाळे यांनी संस्थांना आरोग्य विभागाकडून पुढील काळातही आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार श्रीमती अपर्णा गावडे उपस्थित होत्या. तहसीलदार कार्यालयाच्या टीमचे तसेच दिव्यांग सेना सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. संजय देसाई यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
