You are currently viewing आदरणीय नेते मंडळी व्यक्ती म्हणून उमेदवारी देऊ नकात तर व्यक्तिमत्व म्हणून द्या तरच या शहराचा विकास शक्य – रवी जाधव

आदरणीय नेते मंडळी व्यक्ती म्हणून उमेदवारी देऊ नकात तर व्यक्तिमत्व म्हणून द्या तरच या शहराचा विकास शक्य – रवी जाधव

आदरणीय नेते मंडळी व्यक्ती म्हणून उमेदवारी देऊ नकात तर व्यक्तिमत्व म्हणून द्या तरच या शहराचा विकास शक्य – रवी जाधव

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील जनतेने मागच्या काही वर्षात येथील राजकारणाचा चांगलाच अनुभव घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा अशी चूक नको अशी चर्चा सर्वत्र सुरू असली तरी त्याच व्यक्तीला पुन्हा एकदा जिवंत केले जात आहे आणि समाजामध्ये तळमळीने समाजकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना मागे खेचलं जात आहे मग विकास कसा होईल.
आपल्या या शहराचा सामाजिक कार्यकर्ता म्हणजे लोकाभिमुख काम करणारा व्यक्ती जो या शहरातच नव्हे तर शहराच्या बाहेर देखील तळमळीने समाजकार्य करतो आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांच्या मदतीला धावतो.अशा सच्चा समाजसेवकांना त्याही पेक्षा असं म्हणायला हरकत नाही त्यांच्यासारख्या एका सच्चा व सुरुवातीपासून कोणतेही पद न घेता प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्याला जेव्हा तिकिटासाठी प्रतीक्षा करावी लागते आणि ज्याचं या शहरामध्ये- समाजामध्ये शून्य कर्तुत्व आहे व नेत्याचे कर्मचारी यांच्या आग्रहाखातर अशा व्यक्तींना पुढे केलं जातं आणि जो समाजाच्या सेवेसाठी गेली अनेक वर्षे दिवस रात्र कसलाही विचार न करता स्वतःला झोकून देतो अशा व्यक्तिमत्वाला त्याच्याच नेत्याकडून नाकारल जात हे कितपत योग्य आहे याचा विचार येथील जनता नक्कीच करेल.
परंतु महत्त्वाचा मुद्दा असा की सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या व्यक्तीचे जर अशी परिस्थिती असेल तर यापुढे चांगली व प्रामाणिक माणसं लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात कधीच पुढे येणार नाही ही आजची वस्तुस्थिती आहे.
या शहराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सच्चे समाजसेवक आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व असणारे चार चेहरे या आधी मी सुचवले होते कारण हे आम्ही सर्व मिळून या शहराला सेवा देत आलेलो आहोत त्यामध्ये युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी समीरा खलील, शेखर सुभेदार व रुपा मुद्राळे खरं सांगायचं म्हणजे ही लोक मुळात तशी राजकारणी नाहीत तर प्रत्येकांच्या प्रसंगामध्ये साथ देणारे सेवाभावी व्यक्तिमत्व आहेत आजची परिस्थिती पाहता त्यांना हे नाईलाजाने पाऊल उचलावं लागत आहे.
आताच्या घडीला जर मला कोणी असा प्रश्न विचारेल की या चौघांची सामाजिक कार्य कोणती तर मी छाती ठोकपणे त्यांची शेकडो कामे पुराव्यानिशी एका क्षणात दाखवू शकतो आणि याची गरज पण भासणार नाही कारण येथील जनता या देवदूतांचे काम नेहमीच पाहते. त्यामुळे तिकीट वगैरे या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या नसून जनतेचा आशीर्वादच त्यांच्या सामाजिक कार्यासाठी महत्त्वाचा आहे.
जर या शहराचा विकास हवा असेल आणि जनतेची कामे वेळेत झाली पाहिजे असतील तर फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहूया आणि त्यांना एक संधी देऊया त्या संधीच ते नक्कीच सोनं करतील हा आजपर्यंतचा माझा अनुभव आणि विश्वास आहे तो आपल्या सर्वांचा विश्वास ते सार्थकी लावतील याची खात्री आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा