You are currently viewing जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन —

डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी तर्फे उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी):

डी.जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी यांच्या वतीने कै. दत्ताभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाइड आर्ट), फॉरेस्ट ऑफिस जवळ, सालईवाडा, सावंतवाडी येथे होणार आहे.

या स्पर्धेत विविध गटांनुसार विषय निश्चित करण्यात आले आहेत:

गट अ: नर्सरी ते सिनीअर केजी – रंगभरण स्पर्धा

गट ब: इयत्ता १ ली ते ४ थी – रंगभरण स्पर्धा

गट क: इयत्ता ५ वी ते ७ वी – जत्रा

गट ड: इयत्ता ८ वी ते १० वी – प्लास्टिक मुक्त पृथ्वी

गट इ: खुला गट – दशावतार

स्पर्धकांनी स्वतःचे रंग, ब्रश, ड्रॉइंग पॅड इत्यादी साहित्य सोबत आणायचे असून, स्पर्धेसाठी लागणारा पेपर आयोजकांकडून दिला जाईल. प्रवेश शुल्क ५० रुपये असून, १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नावनोंदणी करता येईल.

विजेत्यांना रोख रक्कम व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. गोविंद उर्फ केदार बांदेकर व सचिव सौ. अनुराधा बांदेकर-परब यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 श्री. तुकाराम मोरजकर – ९४०५८३०२८८
📞 श्री. सिद्धेश नेरुरकर – ९४२०२६०९०३

प्रतिक्रिया व्यक्त करा