दिपसुंदरी स्पर्धेत सौ.स्नेहा कुडतरकर प्रथम.
सौ. मिताली राऊळ विशेष पारितोषिकाच्या मानकरी
बांदा
बांदा येथील सौ. गौरी सावंत-बांदेकर आयोजित दीपसुंदरी स्पर्धा 2025 या खास विवाहित महिलांसाठी घेण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या अशा फोटो स्पर्धेत सावंतवाडी येथील सौ.स्नेहा कुडतरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
त्याचबरोबर द्वितीय क्रमांक सावंतवाडी येथील सौ स्मिता केंकरे यांनी संपादन केला तर तृतीय क्रमांक दोडामार्ग येथील सौ.प्राची सावंत यांनी मिळविला.
तसेच सावंतवाडीच्या सौ.मिताली राऊळ यांना सर्वाधिक फॉलोवर्स आणि व्हिवर्स मिळवणारी एकमेव विजेती स्पर्धक म्हणून विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्तेजनार्थ म्हणून सौ.रीना पाटील, सौ.प्रज्ञा अरोस्कर, सौ.विद्या आंब्रे, सौ.स्मिता नलावडे, सौ. प्रणाली रेडकर, सौ. उत्कर्षा परब या सहा जणींची निवड करण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षण श्री नितीन बांदेकर आणि सौ प्रणिता सावंत यांनी केले. या स्पर्धेत तब्बल 37 विवाहित महिलांनी सहभाग घेतला होता.
सर्व विजेत्यांना आणि सहभागींना आयोजक गौरी सावंत-बांदेकर यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
