मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीपासून सर्वच सण, उत्सव बंद होते. त्यानंतर काही प्रमाणात हे सण नियमानुसार होत आहेत. तर गेल्या वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली होती. त्यानंतर कोणताही उत्सव झाला नाही. आता शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असून. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आणि नियमावली बंधनकारक असल्याने सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी प्रशासनाने नाकारली.
यासंदर्भात गृह मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे. यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाचे नियम पाळणे हे बंधनकारक असणार आहे.
तसेच, यंदाचा शिवजयंतीला मिरवणुकीला परवानगी नाही. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येते. परंतु, सार्वजनिक ठिकाणी आणि लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याखान, किर्तन, मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून केवळ ऑनलाईन पद्धतीने हे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह खात्याने त्यांच्या नियमावलीत सांगितलं आहे.
गृह विभागाने दिलेली नियमावली-
– यंदा गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी
– मिरवणूक, सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये
– केवळ १० व्यक्तींच्या उपस्थितीच शिवजयंती साजरी करावी, बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये.
– आरोग्यविषय उपक्रमे आणि शिबीर यांची जनजागृती करावी
– सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियम पाळण्याकडे अधिकचे लक्ष द्यावे
– स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.