*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*आयुष्यावर बोलू काही*
आयुष्य म्हणजे नेमके काय हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे.जन्मला आलेला प्रत्येक व्यक्ती आप आपल्या्, पध्दतीने जगतो पण फक्त जगण्याला फार महत्त्व नाही.माणसाने कसं जगावं हे जास्त महत्त्वाचं.कारण ज्याला जगणं कळलं तो खऱ्याअर्थाने जगतो म्हणून ज्याचे जगणं सुंदर असेल तो जगाला शिकवतो.तेव्हा स्वत:च जगणं सुंदर करायला हवं उदाहरण द्यायचं झालं तर ‘बाबा आमटे’ यांच देता येईल.बाबा आमटेंनी आनंदवनाची स्थापणा करून अनेक कुष्ठरोगी लोकांची सेवा केली मुक प्राण्यांना आश्रय दिला,अनाथांना निवारा दिला आज ‘प्रकाश आमटे’ हे अनेक सेवाभावी उपक्रम राबवून ज्याचं कोणी नाही त्याच होवून त्यांच्या सेवेत आयुष्य घालवू त्यांचं जगणं सार्थकी लावाताय.संपुर्ण आमटे परिवार आनंदवनात राहून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या हेतूने ते त्यांच जगणं सुंदर करताय. आयुष्य यालाच म्हणतात आणि आयुष्य असच हवं.आयुष्यावर बोलू काही अस अनेकांना वाटत पण आयुष्याबद्दल बोलण्यासारखं आपलं जगणं असेल तर आयुष्यावर बोलायला हरकत नाही.पण जन्माला आलेला एखादी व्यक्ती अनैतिक व्यवहार करत असेल तर त्याच्या बद्दल काय बोलणार.आयुष्यात जर चांगल्या घडामोडी होत असतील तर बोलायला काहीच हरकत नाही पण काहीच नसेल तर काय बोलायचं. आपण जे करतो त्याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे,त्याच कौतुक केलं पाहिजे नाव मोठं झालं पाहिजे हा हेतू ठेवून जर एखादे कार्य करत असाल तर त्याला काहीच महत्त्व नाही.आपण आपलं काम करत रहायचं,जगाचं लक्ष आपोआप आपल्याकडे जाते. बाबा आमटेंनी संपूर्ण आयुष्यात हेच केलं.स्वतःसाठी नाही की स्वतःच नाव होण्यासाठी नाही तर लोककल्याणासाठी त्यांनी सेवेचा मार्ग स्विकारला म्हणून प्रकाश आमटेनी ही त्याच मार्गाने आपल आयुष्य सेवेसाठी समर्पित केले. कुठलाच हेवा दावा नाही,अपेक्षा नाही, स्वार्थ नाही,आजही ते बसने प्रवास करतात शिदोरी बांधून जिथे मोकळी जागा दिसेल तिथे सामान्य माणसासारखे मांडी घालून जेवायला बसतात.कसलाच मोठेपणा, कसलेच आढेवेढे त्यांच्या अंगी नाही म्हणून त्यांच्या आयुष्यावर बोललं जातं.तेव्हा आपल्या आयुष्यावर बोललं गेलं पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपलं जगणं सुंदर असायला हवं.जो जगण्याला महत्त्व देतो त्याच आयुष्य कधीच सुंदर नसतं. टापटीप राहून चांगले कपडे अंगावर भारी भक%A
