*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विद्यार्थी दिवस*
( षडाक्षरी रचना )
संपलेली आज
काळोखी आवस
साजरा होतोय
विद्यार्थी दिवस
अनेक पिढ्यांचा
अंधार वारसा
प्रकाशाला वाव
नव्हता फारसा
तरी धडकले
खूप जोमदार
कष्टाने उघडे
शिक्षणाचे दार
रूढी परंपरा
कोंडलेली मने.
ज्ञान प्रकाशात
उजळली जने
प्रकाश पोचला
गावकुसा मागे
त्यांच्या किरणांनी
सारी वस्ती जागे
ज्यांनी फुलवले
विद्येचे नंदन
बाबासाहेबाना
त्रिवार वंदन
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित

