You are currently viewing जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे सिंधुदुर्गमध्ये यशस्वी संपन्न

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे सिंधुदुर्गमध्ये यशस्वी संपन्न

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे सिंधुदुर्गमध्ये यशस्वी संपन्न

 सिंधुदुर्गनगरी 

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव जिल्हा नियोजन समिती सभागृह, सिंधुदुर्ग येथे उत्साहात पार पडल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली.

महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज मुर्तीचे पूजन करुन झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ व जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते.  तसेच या महोत्सवात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील युवक-युक्तींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

जिल्हाधिकारी श्री. धोडमिसे म्हणाले, ‘युवकांनी योग्य मार्गदर्शन घेऊन करिअर करण्यासंदर्भात मार्गदर्शन घेऊन करिअर करण्याबाबत मार्गदर्शन केले, ‘युवा महोत्सव हा करिअर करण्याकरिता एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. ‘आपल्या महाराष्ट्राला सांस्कृतिक परंपरेचा चांगला वारसा लाभलेला आहे, असे मत व्यक्त केले. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, वक्तृत्व, कथा लेखन, कविता लेखन आणि विज्ञान प्रदर्शन अशा विविध प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धकांनी उत्कृष्ट कलागुण सादर करून प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली.

कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रात गृह पोलीस उपअधीक्षक, श्वेता खाडे यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्ह व रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांची निवड विभागस्तरीय युवा महोत्सवासाठी झाली आहे.

            सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत जिल्हास्तीरय युवा महोत्सव अंतिम निकाल पुढीलप्रमाणे

 सामूहिक लोकनृत्य:-  प्रथम- श्री. स.ह.केळकर कॉलेज, देवगड

                                व्दितीय- दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा, कुडाळ

सामुहिक लोकगीत- प्रथम- दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा, कुडाळ

                            व्दितीय- रंगखांब, कणकवली

कविता लेखन

प्रथम- महेक इब्राहिम शेख

व्दितीय- शिवमणी अजय पाळेकर

तृतीय- अनिकेत कृष्णा तांबे

वक्तृत्व

 प्रथम- दिक्षा प्रकाश राणे

व्दितीय- आर्या लक्ष्मण आगलावे

तृतीय- सुखी श्रीकृष्ण सामंत

विज्ञान  प्रदर्शन

प्रथम- आर्या संतोष धुरी

व्दितीय- दिया दिगंबर वायंगणकर

कथा लेखन

प्रथम – प्रतिक्षा नितीन वेंगुर्लेकर

व्दितीय-ऋतूजा अभिमन्यू पेडणेकर

तृतीय- समृध्दी विलास सरनाईक

चित्रकला

प्रथम- सुधांशु महेंश धुरी

व्दितीय- राम सूर्यकांत बिबवणेकर

तृतीय- प्रथमेश महादेव वेंगुर्लेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा