You are currently viewing सावंतवाडीत २४ व २५ तारखेला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन….

सावंतवाडीत २४ व २५ तारखेला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन….

रोटरी व भोसले नॉलेज सिटीचा उपक्रम…

सावंतवाडी

कोरोनाचा पार्श्वभूमीवर गेल्या आठ-दहा महिन्यांनी शाळा चालू झाल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी रोटरी क्लब सावंतवाडी, आणि भोसले नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान हे प्रदर्शन २४ व २५ फेब्रुवारी या कालावधीत होईल. पाचवी ते आठवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये हे प्रदर्शन घेण्यात येईल, अशी माहिती रोटरी अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ आणि भोसले नॉलेज सिटी चे कार्याध्यक्ष अच्युत भोसले यांनी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

२४ व २५ फेब्रुवारी रोजी तज्ञ परिक्षकांची टीम शाळेंना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून चित्रीकरणही करण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.२८ फेब्रुवारी रोजी विजेत्या संघांना रोख रक्कम,प्रमाणपत्र, व आकर्षित चषकाने येणार आहे.सहभागी शाळांना २३ फेब्रुवारी पर्यंत आपल्या शाळेतच प्रतिकृती तयार करून ठेवायच्या आहेत. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळण्यासाठी जास्तीत जास्त शाळांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन नाव नोंदणी करावी,असे आवाहन रोटरी क्लब सावंतवाडी आणि भोसले नॉलेज सिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी दिलीप म्हापसेकर ८५५०९७५२४२, नितीन सांडये ९८२३८६९१२८ संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा