You are currently viewing वंदेमातरम्

वंदेमातरम्

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा मानसी मोहन जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वंदेमातरम्*

 

वंदे मातरम् हे गीत आमचे

राष्ट्रभक्ती अन एकपणाचे

वर्धापनदिन आज करुया

कौतुक बंकिमचंद्र कविचे

 

शके एकोणिसाव्या शतकी

स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर

नमूद आनंदमठ ग्रंथामध्ये

वंदेमातरम स्थान पानावर

 

राष्ट्रगीत हे झाले सुंदर

वर्ष दिडशे आज जाहली

स्मरणोत्सव दिल्लीत साजरा

भारतभूमी आनंदीत झाली

 

प्रा‌.मानसी जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा