*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शाळेचा डबा*
मधली सुट्टी
भुकेचा ताबा
सर्वांचा निघे
शाळेचा डबा
भाजी भाकरी
चटणी पोळी
कधी एखादी
साखर गोळी
गंध साऱ्याचा
नाकात जाई
खमंग वास
दर्वळ होई
कुणाचं काय
पहात राहू
एकमेकांना
वाटत जाऊ
भर दुपारी
सोबती मित्र
गोपाळकाला
सारे एकत्र
पंच तारकी
हॉटेलातही
तशा डब्याची
गम्मत नाही.
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@सर्व हक्क सुरक्षित
मोबाईल 9130861304
