You are currently viewing फोंडाघाट येथे स्वच्छता रॅलीचे आयोजन

फोंडाघाट येथे स्वच्छता रॅलीचे आयोजन

फोंडाघाट येथे स्वच्छता रॅलीचे आयोजन;

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

फोंडाघाट :

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत फोंडाघाटच्या वतीने फोंडाघाट बाजारपेठ परिसरात स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे विविध संदेश देण्यात आले तर स्वच्छतेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

रॅलीनंतर फोंडाघाट बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट तसेच शाळा क्रमांक एक येथील विद्यार्थी व शिक्षिका भोगले मॅडम यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, फोंडाघाट विकास सोसायटीचे चेअरमन राजन नानचे, सदस्य सुभाष सावंत, मिथिल सावंत, विठ्ठल लाड, स्नेहलता पांचाळ, प्राची धुरी, सायली तेली, प्रीतम भोगले, पवन भालेकर, अनिकेत पारकर, मिलिंद लाड तसेच अंगणवाडी सेविका सायली कदम, मानसी सावंत, रेवडेकर आणि ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.
रॅलीदरम्यान संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.

या उपक्रमामुळे फोंडाघाट परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होऊन ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा