जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात अर्ज स्वीकारणीची प्रक्रिया पार पडणार
मालवण :
मालवण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार असून नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यानिमित्ताने शिवसेनेने तयारीस सुरुवात केली असून अर्ज स्वीकारणीची प्रक्रिया शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
शिवसेनेतून निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी आपले मागणी अर्ज शुक्रवार सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मालवण येथील पक्ष कार्यालयात भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
संघटनेच्यावतीने इच्छुक उमेदवारांना वेळेत उपस्थित राहून आपली उमेदवारी निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
