You are currently viewing भरधाव कॅन्टरने दुचाकीला ठोकरल्याने महिला गंभीर जखमी

भरधाव कॅन्टरने दुचाकीला ठोकरल्याने महिला गंभीर जखमी

भरधाव कॅन्टरने दुचाकीला ठोकरल्याने महिला गंभीर जखमी

कॅन्टर चालक पोलिसांच्या ताब्यात

बांदा : प्रतिनिधी

बांदा शहरात उड्डाणपुलाखाली श्रीराम चौकात कॅन्टरने दुचाकीला भरधाव वेगात जोरदार धडक दिली. यात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली महिला रस्त्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाली. रजनी रामकृष्ण गावडे (३९, रा. घारपी) असे तिचे नाव आहे. बांदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघात स्थळावरून पळून जाणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे. हा अपघात आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला.

 

दुचाकीवरील दाम्पत्य सावंतवाडीहून बांद्यात येत होते. तर कॅन्टर दोडामार्गहुन भरधाव वेगात बांदा शहरात येत होता. श्रीराम चौकात त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे सहकारी पोलीस कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी महिलेला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी प्राथमिक उपचार केलेत. महिलेच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. अधिक उपचारासाठी बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा