फोंडाघाट : श्री राधाकृष्ण मंदिरात काकड आरती सांगता – भक्तिमय वातावरणात महाप्रसादाचे आयोजन
फोंडाघाट (प्रतिनिधी) –
येथील श्री राधाकृष्ण मंदिरात गेल्या एक महिन्यापासून रोज सकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत सुरू असलेली काकड आरती आज सांगता सोहळ्याने संपन्न होत आहे. या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, सकाळपासूनच भाविकांची गर्दी दिसून येत आहे.
सांगता कार्यक्रमानिमित्त दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचे नियोजन फोंडाघाट येथील सर्व व्यापारी व नागरिकांनी एकत्रितपणे केले असून, सर्व भाविकांना प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी आरती, कीर्तन, नामस्मरणाने वातावरण पवित्र होणार असून, भक्तांना एक भक्तिमय क्षण अनुभवता येणार आहे. श्री राधाकृष्ण आणि श्री गणपती बाप्पा मोरया यांच्या जयघोषात संपूर्ण गाव आज श्रद्धा-भक्तीने उजळून निघणार आहे. 🙏
श्री राधाकृष्ण मंदिर समिती, फोंडाघाट यांच्या वतीने सर्व भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

