महेंद्रा अकॅडमी वाचनालय कुडाळचा विद्यार्थी वैभव कवडे यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड —
सावंतवाडी संस्थानच्या युवराजांच्या हस्ते गौरवशाली सन्मान
कुडाळ :
महेंद्रा अकॅडमी कुडाळ वाचनालयाचा विद्यार्थी वैभव कवडे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर (State Tax Inspector) या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे. महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी म्हणून वैभव यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण अकॅडमीसाठी अभिमानास्पद ठरले आहे.
या उल्लेखनीय यशानंतर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले साहेब आणि युवराज्ञी श्रद्धाराजे लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते वैभव कवडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. युवराज दांपत्यांनी वैभव यांचे तोंडभरून कौतुक करत त्यांच्या परिश्रम व जिद्दीचे मनापासून अभिनंदन केले.
महेंद्रा अकॅडमी कुडाळच्या संपूर्ण टीमतर्फे वैभव कवडे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना! 💐✨
