*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मागे वळून पहाता*
मागे वळून पहाता,काय राहिले आता
आयुष्याच्या वाटेवर जे साहिले
चालता
साश्रू नयनांनी निरोप सर्वां दिधले
निघता
नको भार आपुला इथलेसारेसंपले
साहता।
मानवजन्मा येऊनि जे जे कर्तव्य होते माझे
धडपडत कां होईना त्यास पूर्णत्व
ध्येय माझे
करीत राहिलो नित धरोनि एकत्व
तत्व माझे
सावरोनि स्वतःला राखिले मीसत्व
ध्येय माझे।
मिळे ना मिळे पुनरपि मानवजन्म
पृथ्वी वरी
स्वप्ऩेनयनी घेत जागलो आजन्म
या भुवरी
मार्ग शोधित यशस्वितेचा देहजन्म
सृष्टीवरी।
थकलो आता पार मी दिसेपैलतीर
हा समोरी
अंधुकसा आठवे साजरा ऐलतीर
कां माघारी
सत्यात साहिले कधी ,ते तीव्रतीर
दुःख भारी
निरोप घेता मोकळे आकाश सुंदर
वाटे भारी।
स्वप्न गंधा सतीश आंबेतकर
मुंबई विरार

