You are currently viewing माझ्यापुढे येऊन

माझ्यापुढे येऊन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझ्यापुढे येऊन*

 

माझ्यापुढे येऊन

सर्व सांडून गेलास

साठवून लपवलेले

समोर मांडून गेलास

 

रंगवलेली स्वप्न

मनात कोंबली होती

का येऊन माझ्यापुढे

सारी दारे उघडून गेलास

तुझ्याकडचे सारे शब्द

मी सोसले होते

मी बोलणार तेव्हा

समोर काहीच उरले नव्हते

 

पाऊस आजही आला आहे

पाणी तसेच भरले आहे

कधी तू होतास

आता माझी मीच आहे

पण

आज तू पुन्हा मला

होता तशाच आठवून गेलास

माझ्याच रागामध्ये मला

मला झुरवून गेलास

सारे काही अजून माझ्या

आठवणीत तसेच आहे

तुझे ते गोड हसणे

साठवणीत तसेच आहे

 

गालावरच्या खळीमध्ये

मीच घसरून पडली होती

चोरून मला तू पाहताना

माझी मीच फसली होती

दारामध्ये आज मात्र मी

एकटीच उभी आहे

शब्दांच्या पुराचे पाणी

बाहेर टाकत आहे

 

काही झाले तरी शेवटी

माझी मी तसीच आहे

शब्द,भावना आणि तू

यामध्येच झुलते आहे

अजूनही मनात एक

आशा टिकून आहे

वाटेत कधी दिसशील म्हणून

दारात मी उभी आहे

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे@

9870451020

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा