You are currently viewing अमृत ठेवून जिव्हेवरती

अमृत ठेवून जिव्हेवरती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अमृत ठेवून जिव्हेवरती*

 

आटोपून आपले *सुगंधी स्नान*

*कर्तव्ये निभावतेस गृहिणीची*

कसा विसरेल तुला *मोरया*

करतेस सेवा तू *विनायकाची*

//1//

 

हसतमुखाने करून *स्वयंपाक*

चविष्ट रोज रोज आमच्या समोर

वाहव्वा करतो मी *मनापासून*

जाहीर करतोय आज *सर्वांसमोर*

//2//

 

सोमवार आजचा *गृहिणी दिन*

हरिहरेश्वराचे आहेत *आशीर्वाद*

रोजच *वाढतेस गरमा गरम*

दादही देतो तुजला *निर्विवाद*

//3//

 

पैजेवर खायचो *पुरणपोळ्या*

करताना नाही कधी *दमलिस*

मोजून नाही खायच्या कुणीही

अजून आठवत तेव्हा म्हणालीस

//4//

 

विचार आहे पुस्तक लिहायचा

झेपणार *नाही* उतार वयात

“नाही” शब्द ठाऊक आजवर

कशी करायची *यावर मात*

//5//

 

खातो आवडीने करशील तसे

ठेवायचे नसते *अन्नाला नाव*

*अमृत* ठेवून *जिव्हेवरती*

वळणच तसे *सांगतो राव*

//6//

 

खरच नाही कौतुक *वरवरचे*

मनापासून करतोय *स्तुती*

गरज नाही *भासली मजला*

खेळलो *नसलो* जरी कुस्ती

//7//

 

करून कविता *पत्नीवरती*

घेतोय आता मी *आवरती*

भरपूर जेवणार आज रात्रीला

सोबत असणारे सौभाग्यवती

//8//

 

विनायक जोशी /ठाणै

मीलनध्वनी/9324324157

सोमवार 03 नोव्हेंबर 2025

प्रतिक्रिया व्यक्त करा