अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी केला दोघांचा सत्कार; प्रांताधिकारी यांनी काढले गौरवोद्गार
सावंतवाडी
कोरोनाच्या संकट काळात गरीब व गरजू कुटुंबांना मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी यांनी मदत करत त्यांना धान्य वाटप केले होते. तसेच लॉक डाऊनमुळे सीमेवर अडकलेल्या शेकडो ट्रक चालक व क्लीनर यांना स्टोव्ह, भांड्यासह जीवनावश्यक वस्तू दिल्या होत्या. तसेच सावंतवाडी परिसरातील २५००० जणांना कोरोना प्रतिबंधात्मक मास्क, सॅनिटायझर व साबणाचे वाटप केले होते. तसेच या काळात ते रस्त्यावरील भडक्या प्राण्यांसाठी आधारवड ठरत त्यानी माणुसकी आणि भूतदया दाखवत त्यानी त्या प्राण्यांना खाद्य पदार्थांसह पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. या दोघांनी देवदूत बनत या कठीण काळात लोकांची सेवा करण्यात धन्यता मानत निस्वार्थी वृत्तीने कार्य केले होते त्यानी केलेल्या या कार्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ तसेच झाड देऊन आज त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी देखील त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे व अन्य मान्यवर उपस्थित होते.