त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने शहरामध्ये यंदा मोठ्या प्रमाणे दीपोत्सव साजरा करूया.
सावंतवाडी
शहरामध्ये प्रत्येक नागरिक व प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये सुख शांती लाभावी प्रत्येकाचा आयुष्य दिव्य ज्योती प्रमाणे उज्वल व्हावे ही भावना डोळ्यासमोर ठेवून सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दीपोत्सव सुरू केला होता. या शहरात दीपोत्सव हि परंपरा अखंडित अशीच पुढे चालू ठेवण्याकरिता उद्याचा दीपोत्सव माझ्या प्रत्येक महिला भगिनींनी व बांधवानी आपल्या जवळच्या मंदिरात तसेच आपल्या घरासमोर पाच तरी पणत्या लावून त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त हा दीपोत्सव साजरा करावा असे नम्र आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. उद्याचा त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सव आपलं सर्वांचं आयुष्य उज्वल करणारा असेल अशी परमेश्वराजवळ आम्ही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने प्रार्थना करत आहोत.
