*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुख म्हणजे नक्की काय असतं?*
सुख म्हणजे नक्की काय असतं?
तुमचं नि माझं, सारखं नसतं!
आयुष्य असतं हो ,क्षणभंगुर,
नाही करायची कधी कुरकुर
क्षणिक मोहाला, भुलायचं नसतं
तुमचं नि माझं सारखं नसतं ।।१।।
सुख मानायांचे ,मिळेलं जेव्हढे
प्रेम करायचे, जमेल तेव्हडे
उगाच मनात, झुरायचं नसतं
तुमचं नि माझं सारखं नसतं !
झाले प्रसंग, विसरून जावे
जगाला नेहमी, आनंदी दिसावे
कधीहीदुःखात ,राहायचंनसतं
तुमचं नि माझं सारखंनसतं।
सुख म्हणजे नक्कीकायअसतं
तुमचं नि माझं सारखं नसतं
सुख म्हणजे नक्की हेच असतं
तुमचं नि माझं सारखं नसतं
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
