You are currently viewing तेरा ऑन कॉल रक्तदात्यांनी एकाच दिवशी दिले पाच रुग्णांना जीवदान

तेरा ऑन कॉल रक्तदात्यांनी एकाच दिवशी दिले पाच रुग्णांना जीवदान

तेरा ऑन कॉल रक्तदात्यांनी एकाच दिवशी दिले पाच रुग्णांना जीवदान

सिंधुदुर्ग

गुरुवार ३० ऑक्टोबर २०२५ रोजी GMC बांबोळी येथे बायपास सर्जरीसाठी एबी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असताना ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित रक्तदाते आनंद देसाई, भूषण मालवणकर, जयदीप पडवळ, रामचंद्र भालेकर, शेखर दळवी तसेच आभाळमाया ग्रुपचे सदस्य संदीप कर्पे या सर्वांनी तातडीने GMC रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.
त्याचप्रमाणे याच दिवशी एस. एस. पी. एम. लाईफ टाइम हॉस्पीटल रक्तपेढी पडवे येथे एका पेशंटला बायपास सर्जरीसाठी ओ पॉझिटिव्ह रक्ताची तातडीची आवश्यकता होती. संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते तथा युवा विकास प्रतिष्ठान, सांगेलीचे सदस्य सुहास राऊळ, स्वप्नील मेस्त्री, दर्शन राऊळ, दत्ता मेस्त्री यांनी रक्तदान केले. तर अजून एका ओटवणे येथील पेशंटच्या बायपास सर्जरीच्या वेळी नियमित रक्तदाते चेतन देसाई यांनी रक्तदान केले. तसेच याच दिवशी संध्याकाळी राणी जानकीबाई रुग्णालय, सावंतवाडी येथे ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या रक्ताची एका भगिनीला अचानक तातडीची गरज भासली. त्यावेळी संस्थेचे नियमित रक्तदाते गिरीश सावंत यांनी ताबडतोब रात्री साडेआठ वाजता एस. एस. पी. एम. रक्तपेढीमध्ये जाऊन बहुमोल असे रक्तदान केले. या तिन्ही पेशंटसाठी रक्तसंकलनाचे वेळी एस. एस. पी. एम. रक्तपेढीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी मनिषजी यादव यांचे सहकार्य लाभले.
त्याचप्रमाणे रात्री उशिरा खाजगी हॉस्पिटलमध्ये आलेल्या मातोंडमधील एका फ्रॅक्चर असलेल्या पेशंटसाठी संस्थेमार्फत एक रक्तदाता व रक्तदाता कार्ड देऊन पेशंटसाठी रक्त उपलब्ध करुन देण्यात आले.
या पाचही पेशंटसाठी रक्ताची सोय होण्यासाठी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे रक्तदाते पंढरी सावंत, सिद्धेश परब, विनायक वर्णेकर, दशरथ गडेकर, ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर,सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्दार्थ पराडकर, आभाळमाया ग्रुपचे गणेश मोरजकर आणि रोहन कदम इत्यादीनी प्रयत्न केले.
दरम्यान ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष मा. दयानंजी गवस सर यांनी एकाच दिवशी या पाच पेशंटसाठी रक्तदान करुन त्यांना जीवनदान देणाऱ्या रक्तदात्यांना धन्यवाद दिले आहेत. तसेच रक्ताची पूर्तता होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा