You are currently viewing विमल-अचल

विमल-अचल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

       *”विमल-अचल”*

 

विठ्ठलाचे रूप विराजे विमल-अचल

सर्वांना प्रिय लोभस निर्मळ मुख कमलIIधृII

 

कृष्ण रुक्मिणी शिव विष्णु असे सांप्रत

सर्व देव आहेत सामावलेले तुझ्यांत

सर्व संतांचे आहे मुख्य दैवत प्रेमळII1II

 

पांढुर रंग दर्शवी शुद्ध सात्विक समाधान

तुळशीहार गळा कासे पितांबर लेऊन

विराजे कंठी कौस्तुभ मणी कानी कुंडलII2II

 

विटेवरी उभा कटेवरी ठेवून हात

अर्धोन्मिलीत नजरेनं भक्तांची वाट पहात

तव रूपाची आभा भेदातीत मंगलII3II

 

संतांनी रचले तव स्वरूपावर अभंग

शतकानु शतके वारकरी गाती अभंग

विश्वाचे दैवत किर्ती अगाध कृपाशीलII4II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा