*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्पर्श*
〰️〰️
स्पर्श तुझ्या तळहाताचा
मृदुल कोमली मी स्मरतो
हृदयीची स्पंदने अबोली
मी आज शब्दात गुंफितो
जे अव्यक्त व्याकुळलेले
मी पापणीत मिटुनी घेतो
निःशब्दशा त्या पाझरांना
मी नित्य अंतरात प्राशितो
हे प्रीतीगूढ शब्दभावनांचे
अविरत उलगडीत राहतो
सत्यातले पावित्र्य प्रितीचे
जे चिरंजीवी तेची शोधतो
न्याहाळत निरभ्र आभाळ
तुझ्याच स्मृतीत मी जगतो
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*वि. ग. सातपुते.(भावकवी)*
* *9766544908*
