फोंडाघाटमध्ये श्रद्धेने साजरी केली कार्तिकी एकादशी
फोंडाघाट
आज फोंडाघाट येथे भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तीभावाने कार्तिकी एकादशी साजरी केली.
पावन देवी श्री विठ्ठल मंदिर आणि पावना देवी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ११ दिवसांचे भजन-कीर्तन पार पडले.
या कार्यक्रमाचा समारोप कार्तिकी एकादशीच्या दिवशी मोठ्या उत्साहात झाला.
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सकाळी श्री विठ्ठल मंदिर तसेच मारुती वाडी येथील दर्शन घेतले.
दोन्ही ठिकाणी जागृत देवस्थानाचे दर्शन घेऊन भाविकांना आनंद झाला.
पावना देवी मंदिरात आज उपवासाच्या निमित्ताने साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

