You are currently viewing ५ नोव्हेंबरला तेंडोली रवळनाथ पंचायतनचा जत्रोत्सव

५ नोव्हेंबरला तेंडोली रवळनाथ पंचायतनचा जत्रोत्सव

कुडाळ:

तेंडोली गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ रोजी सकाळी ८ पासून दर्शन व ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, रात्री ८ वाजता टिपर (पणत्या) लावणे,१० वाजता पालखी सोहळा, ११ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहिकाला होऊन सांगता होणार आहे, उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी व तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा