You are currently viewing विठूराया

विठूराया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*विठूराया*

 

आज देव ऊथ्थानी एकादशी.

देवांची विश्रांती संपुन पुन्हा देव भक्तांसाठी ऊभे राहिले.

या विठूरायाला काकडा आरती करुन आर्जव करुन ऊठवले जाते.

त्याची मानस पूजा स्नान, ऊटी, वस्त्र इ. अर्पण करून केली जाते. आणि मग केशराचे दूध ,देऊन देव भक्तांसाठी ऊभे रहातात.

सावळाच रंग तुझा…. म्हणत देवांचे कौतुक करत स्तुतीगीते गायली जातात.

कानी कुंडले हालती, डोक्यावर चांदीचा टोप, कटी पितांबर गळा तुळशी माळा, पायात चांदीचे तोडे हात मात्र कटेवरी . खांद्यावर जरीचा शेला असे हे देखणे राजस सुकूमार रूप दिसू लागते.

शेजारी वामांगी सजलेली रखमाई म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणाचाच जोडा. बघताना तिचा साज शृंगार देहभान हरपुन जाते.

जो तो लेकरांप्रमाणे धावत येतो तो या मायबापांना भेटायला. आपले कुशल सांगायला, गार्हाणे घालायला.

असे सर्वांचे सुख दु:ख तो जाणुन घेतो. डोळ्यात प्रेम ओसंडत असते. मायलेकरांचीच भेट ती.! साधा सुधा हा देव हाती एकही शस्त्र नाही.

न थकता लेकरांना दर्शन देत ऊभा असतो.

ती पण ऊपास करत दिवसभर त्याचेच चिंतन करत रहातात.

पंढरपूर म्हणजे त्यांचे माहेरच.

भक्तीरंगात देव आणि भक्त सारेच रंगून जातात.

जात पात धर्मभेद गरिब धनवान सर्वांचाच तो अंतरी ठाण मांडुन‌बसलेला देव आहे.

भक्तांच्या भक्तीला जागत तो भक्तांचा सेवक, दास बनतो.

जनीचे दळण कांडण, कबिराचे शेले विणतो, गोरा कुंभाराची मडकी करतो. नाथाघरी पाणक्या श्रीखंड्या होऊन‌ न संपणारा रांजण भरतो, सावताचा मळा राखतो तर कोणाची गुरे हांकतो.

असा हा भक्ताने दिलेल्या वीटेवर त्याची वाट बघत युगे न युगे ऊभा आहे. रागावला , शाप दिला हे असलं त्याला काही माहित नाही. मीरेसाठी वीषही पितो व सावळा बनतो.

मग त्याची ही लेकरं त्याच्या मायेसाठी का नाही धावत पंढरपूरी चंद्रभागेच्यातिरी विठूनामाचा गजर करत येणार?

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा