सरमळे मंदिर नजीक ओहोळ परिसरात बिबट्याचा संचार.
ओटवणे (प्रतिनिधी )
सरमळे मंदिराच्या नजीक नांगरतास येथे जाण्याच्या मार्गांवर ओहोळावर बिबट्याचे दर्शन घडले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.या भागातून रात्री 9 वाजता च्या दरम्यान नांगरतास येथील रामरक्षक डेकोरेशन चे सचिन देसाई आपल्या वाहनाने जात असताना त्यांच्या समोर अचानक बिबट्या आला.अचानक बिबट्या समोर आल्याने सचिन देसाई घाबरून गेले मात्र त्यानंतर बिबट्या जंगल भागात निघून गेला.या भागात जंगली जनावरे हिंश्र श्वापदांचा नेहमीच वावर असतो मात्र बिबट्या च्या मुक्त संचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या अगोदर महिन्याभरापूर्वी या परिसरात बिबटया शिकारी साठी भर वस्तीत घुसला होता. आणि ही घटना सिसिटीव्ही मध्ये कैद झाली होती.ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा बिबट्याचे झालेले दर्शन यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

