You are currently viewing देवगडात ३०० वर्षांनंतर श्री देव रामेश्वर मंदिरात भव्य त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सव

देवगडात ३०० वर्षांनंतर श्री देव रामेश्वर मंदिरात भव्य त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सव

५ नोव्हेंबरला दीपोत्सव, देवस्वारी, भजने आणि पालखी प्रदक्षिणेने मंदिर परिसर होणार भक्तिमय आणि तेजोमय

देवगड :

देवगड तालुक्यातील मिठबाव, तांबळडेग,कातवण या तीन गावचे ग्रामदैवत असलेल्या मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात सुमारे ३०० वर्षांनी बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री देव रामेश्वर मंदिरात भव्य व दिमाखदार त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सव सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने आयोजित दीपोत्सवामुळे मंदिर परिसर हजारो दिव्यांनी प्रकाशमय होणार असून, भक्तिमय वातावरणात हा सोहळा तेजोमय होणार आहे.

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची रूपरेखा अशी सायंकाळी ४.०० वा. श्री देव रवळनाथ मंदिरातून श्री देव रामेश्वर मंदिराकडे सर्व देवांचे संपूर्ण साज-शृंगारासह देवस्वारीचे आगमन, सायंकाळी ६:३० ते रात्रौ ११:३० स्थानिक कलाकारांकडून सुश्राव्य भजने व गायन कार्यक्रम, सायंकाळी ७:०० वा. दीपोत्सवाचा शुभारंभ. रात्रौ ११:३० ते १२:०० भव्य पालखी प्रदक्षिणा सोहळा, रात्रौ १२:३० ते २:३० वारकरी दिंडी सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत.

या त्रिपुरारी पौर्णिमेच्या यात्रोत्सवासाठी येणाऱ्या व्यापारी वर्गाने श्री देव रामेश्वर देवस्थान समितीशी संपर्क साधला असे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले आहे. हा वार्षिक उत्सव यात्रौत्सव भव्यतेने, भक्तिभावाने आणि दैदिप्यमान वातावरणात पार पडणार आहे.संपूर्ण गावातील नागरिकांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, ही विनंती.

आपण सर्वजण या पवित्र त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी उपस्थित राहून शंभू महादेवाचे दर्शन घ्यावे. तसेच दीपोत्सवाचा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचे प्रत्यक्ष साक्षीदार व्हावे.असे श्री देव रामेश्वर देवस्थान समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा