You are currently viewing सोsssहम्

सोsssहम्

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम लेख*

 

*सोsssहम्*

 

*हूं स्वतंत्र निश्चल निष्काम*

*ज्ञाता द्रष्टा आतमराम*

 

कोsssहम्? कोण आहे मी? अनादी काळापासून उत्तर शोधत असलेला हा सनातन प्रश्न! स्त्री? पुरुष? ते कोणीतरी तर असणारच. पण हे तर फक्त बाह्यदृष्टीला दिसणारं ढोबळ उत्तर झालं. सकृतदर्शनी जरी ते बरोबर असलं तरीही यापैकी मी कोणीही नाही. मी तर फक्त एक आत्मा आहे. निश्चल, निष्काम, ज्ञाता, द्रष्टा, स्वतंत्र असा आत्मा! फक्त आत्माच नाही तर आत्माराम!

 

*मै वह हूं जो हैं भगवान*

*जो मैं हुं वह हैं भगवान*

*अन्तर यही ऊपरी जान*

*वे विरागी मै राग-वितान*

 

आता मी जो आहे तोच तर ईश्वर आहे. ईश्वर बनण्याची क्षमता माझ्यात आहे. फक्त मनापासून प्रयत्न करायला हवेत.

अंतरंगात डोकावून पाहायला हवं. ईश्वर म्हणजे तरी दुसरं काय असतं! स्वतःबरोबरच अवघ्या चराचराचं कल्याण करण्याची इच्छा असणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करुन स्वतःची क्षमता वाढवणं एवढंच! मग अशक्य काहीच नाही. फक्त स्वतःतील अमर्याद शक्तीला ओळखायला हवं. कारण आमच्यात अंतर फक्त एवढंच आहे की माझ्यात अजून माया, लोभ, मान, अपमान, राग, द्वेषादी विकार ठासून भरलेले आहेत आणि ते मात्र या सर्व विकारांपासून खूप खूप दूर आहेत.

 

*मम स्वरूप है सिद्ध समान*

*अमितशक्ती सुखज्ञाननिधान*

*किन्तु आशवश खोया ज्ञान*

*बना भिखारी निपट अजान*

 

कसं आहे माझं स्वरूप? एखाद्या मुक्ती मिळालेल्या सिद्धासारखं! माझ्यात प्रचंड शक्ती आहे. सुखाचं निधान आहे मी! परंतु खंत अशी आहे की याची जाणीवच मला नाही. आणि म्हणून मी खोट्या सुखाच्या आशेत दारोदार भटकतो आहे.

 

*सुख दुःख दाता कोई ना आन*

*मोह, राग, रुष दुःख की खान*

*निजको निज, पर को पर जान*

*फिर दुःख का नही लेश निदान*

 

एक लक्षात घ्यायला हवं! आपण उपभोगणारं सुख किंवा भोगणारं दुःख हे आपल्याच कर्माचं फळ आहे. ते दुसरं कोणीही आपल्याला देत नाही. किंवा आपणही कोणाचं भलं बुरं करू शकत नाही. एकदा स्वतः स्वतःची ओळख करून घेतली आणि स्वतःशिवाय इतर सर्व परके आहेत याची जाणीव झाली तर दुःखाचं मूळच नष्ट होईल.

 

*जिन, शिव, ईश्वर, ब्रम्हा, राम*

*विष्णू, बुद्ध, हरी जिसके नाम*

*राग त्याग पहूंचु निजधाम*

*आकुलता का फिर क्या काम*

 

अरे! आपण वेगवेगळ्या नावांनी त्या ईश्वराला ओळखतो. वेगवेगळ्या उपचारांनी त्याची पूजा करतो. वेगवेगळ्या भजन कीर्तनांनी त्याची आळवणी करतो. ते प्रसन्न होतील किंवा कोपतील म्हणून नवससायास करतो. जितके धर्म, पंथ, जाती, उपजाती तितक्या त्यांच्या पूजा-भक्तीच्या पद्धती वेगळ्या! मग त्यावरून वाद-विवाद, चर्चा, भांडणं अगदी मारामाऱ्या सुद्धा! त्याला हे अभिप्रेत नाही रे! किंबहुना त्याला काहीच अभिप्रेत नाही. निष्काम भावनेनं, निर्मळ अंतःकरणानं, कुठल्याही बाह्य उपचाराशिवाय, आकुलतेशिवाय केलेली उपासना मुक्ती साठी पुरेशी आहे.

 

आणि आता मला ह्याचं नीट आकलन झालं आहे. बघा, एकदा नीट बघा माझ्याकडे! माझ्या बाह्यांगावरून दृष्टी हटवून, भौतिक जगापासून दूsssर अंतरंगाकडे वळलेल्या माझ्या अर्धोन्मिलित नेत्रांकडे बघा, मनाला सूचना देऊन मनावर नियंत्रण ठेवणाऱ्या दोन भृकुटींच्या मधील आज्ञाचक्राकडे लक्ष द्या, आणि या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे माझ्या मुखावरील सात्विक स्मित! त्याकडे जरा निरखून बघा.

 

तिथे तुम्हाला कोsssहम् चं उत्तर निश्चितच सापडेल. होय…

*सोsssहम्, सोsssहम्, सोsssहम्*

 

भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

9763204334

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा