अणसूर ग्रामपंचायत येथे गावातील महिलांना स्वयंरोजगाराचे धडे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ‘फास्ट फूड कौशल्य प्रशिक्षण’
वेंगुर्ले
अणसूर ग्रामपंचायत येथे गावातील महिलांना स्वयंरोजगाराची नवी दिशा अनुभवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ‘फास्ट फूड कौशल्य प्रशिक्षण’ देण्यात आले. या प्रशिक्षणाद्वारे महिला कसा स्वयंरोजगार उभा करू शकतात याची माहिती दिली.
अणसूर – ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित महिलांसाठी फास्ट फूड कौशल्य प्रशिक्षण देऊन यशस्वी समारोप करण्यात आला. या प्रशिक्षणा मध्ये सहभागी झालेल्या महिलांना फास्ट फूड बनवण्याचे अध्यावत कौशल्य प्राप्त झाले असून समारोपवेळी सरपंच सत्यविजय गावडे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सहभागींना प्रशस्थिपत्रके वितरित करण्यात आली. समारोपावेळी सरपंच सत्यविजय गावडे यांनी मनोगत व्यक्त करताना आजच्या काळात फास्ट फूड कौशल्य प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे, आणि रोजगारभीमुख आहे, याचे महत्व रोजगाराची संधी फास्ट फूड उद्योगाला शहरी, तसेच ग्रामीण भागात मोठी मागणी आहे, या प्रशिक्षणा मध्ये घरगुती खाद्यकेंद्र किंवा फास्ट फूड स्टॉल लावू शकतात. यातून त्वरित रोगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. स्वतःचा व्यवसाय चालू करून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व कुटुंबाच्या उत्पनात भर घालू शकतात,महिलांचा आत्मविश्वास व समाजात सक्रिय योगदान देऊ शकतात आणि त्याच उद्धेशाने महिलांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रशिक्षणा मध्ये यशस्वी प्रयत्नाचे कौतुक करण्यात आले, त्यांना भविष्यातील उद्योगासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, संयमी गावडे, साक्षी गावडे, सुधाकर गावडे, सीआरपी, शिला देवूलकर, रुचिता गावडे प्रशिक्षनार्थी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. भविष्यात स्वयंरोजगाराच्या प्रयत्नांना ग्रामपंचायत पूर्णता सहकार्य करेल अशी ग्वाही देऊन सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


