You are currently viewing प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १२व्या पुण्यतिथीनिमित्त ओटवणेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १२व्या पुण्यतिथीनिमित्त ओटवणेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १२व्या पुण्यतिथीनिमित्त ओटवणेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

ओटवणे प्रतिनिधी

ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १२ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त रविवार २ नोव्हेंबर रोजी समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज माणगाव येथील वैकुंठवासी प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर गुरुपरंपरेतील वैद्यराज परमपूज्य बाबा महाराज मानवतकर महाराज यांचे पट्ट शिष्य होते. कुडाळकर महाराज यांच्या पुणे गोखलेनगर येथील श्री दत्त सदनात गेल्या ५७ वर्षांपासून श्री गुरुचरित्र अखंड पारायण सप्ताह, श्री दत्त जयंती, श्री दत्त याग, गुरुपौर्णिमा आदी कार्यक्रम अखंडपणे सुरू आहेत. गुरुकृपेने त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रोगी बरे करताना असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून त्यांच्या कुटुंबांचे कल्याण केले. त्यांचे देशभरासह जर्मनी, अमेरिका, युरोप, मॉरीशिअस आदी परदेशात हजारो प्रचंड शिष्यवर्ग आहे.
यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ९ वाजता सर्व देवतांचे पूजन, सकाळी १० वाजता प पू प्रेमानंद स्वामी महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेक, सकाळी ११ ते वाजता पिंपरी संत तुकारामनगर येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळाचे सुश्राव्य वारकरी सांप्रदायी भजन ह.भ.प. श्री. अशोक महाराज गुरव, श्री गोरक्षनाथ महाराज टाव्हरे व ह. भ. प. चंद्रकांत महाराज घोडे हे सादर करणार आहेत. दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता वारकरी सांप्रदायिक हरीपाठ, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ वाजता ह. भ. प. टाव्हरे महाराज (मंचर) यांचे वारकरी सांप्रदायिक किर्तन होणार असून संगीत साथ पिंपरी पुणे येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळाची आहे. ओटवणे कापईवाडी येथील श्री गणेश प्रासादिक भजनी मंडळाचाही यात सहभाग आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अँड सुरेंद्र मळगावकर आणि डॉ अनिकेत कुडाळकर यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा