You are currently viewing भात पीक नुकसानीसाठी पंचनामे सुरू

भात पीक नुकसानीसाठी पंचनामे सुरू

भात पीक नुकसानीसाठी पंचनामे सुरू; राज्य सरकारकडून हेक्टरी ₹५०,००० मदत जाहीर

दोडामार्ग – गिरोडे (प्रतिनिधी) :

अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या गिरोडे परिसरात नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारी व मागणीनंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली असल्याची माहिती विनायक रामा गावस (रा. गिरोडे) यांनी दिली.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत सरसकट हेक्टरी ५०,००० रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली असून, या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानीत भरडलेल्या शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत नुकसानभरपाई लवकर मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा