You are currently viewing कशाला देता नावं वेगळी ?

कशाला देता नावं वेगळी ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कशाला देता नावं वेगळी?*

 

कशाला देता नावं वेगळी?

वादळ म्हणजे फक्त उन्माद

होते नुकसानीची परिसीमा

किती जीव होती *बरबाद*

//1//

नारळी पोफळी केळी बागा

शाप तयांचा मिळे वादळास

मेहनत करून *वर्षोनवर्षे*

नेतात *वादळे* रसातळास

//2//

बाळे सारी *शेतक-यांची*

प्राण जाऊन *मान टाकती*

धाय मोकलून रडतो “राजा”

“आतबट्ट्याची” ठरते शेती

//3//

पपई केळी द्राक्ष *बागाही*

क्षणात बुंधे आकाश पहाती

घास तोंडचा “बळीराजाचा”

हिसकावण्याची होते छाती

//4//

वादळ नसून काळ सावली

नशीबी असे आधी लिहीली

कष्टांचे करून दफन भूमीत

वर्षोन वर्षे *विकट हांसली*

//5//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा