You are currently viewing पावसा पावसा

पावसा पावसा

*उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार, सामाजिक कार्यकर्ती, पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पावसा पावसा*

 

पावसा पावसा

येतोय मुसळधार

कोसोळतोय सारखा

नदी,नाले,तलाव,तळी

तुडुंब भरले

रस्ते पाण्यात बुडून

रस्त्यांच्या झाल्या नद्या

घरांमध्ये पाणी शिरले

झोपड्या तर पाण्यात बुडाल्या

जिकडे तिकडे पाणीच पाणी

उडालाय हाहा:कार

 

 

घरे सोडून लोक

इतरत्र गेले आश्रयाला

पुरातून वाहून चाललेत संसार

गुरे,ढोरे,माणसे

 

 

शेतीभाती पिकवून

प्राणीमात्राला चारा , पाणी, अन्न दे

दयाघना

करुणाघना

कसारे झालास

निर्दयी ?

 

 

आता जरा थांब

थोडा विसावा घे

होऊ दे जीवन पुर्ववत

मग पुन्हा ये!

 

 

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा