You are currently viewing मी माझी

मी माझी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मी माझी*

 

मी काळोखाच्या जाळी

वेदनेस गिरवत होते

आभासी स्वप्नांमधे

मी मलाच रिझवित होते….

ना कुणी आपले येथे

जरी दिसती येथ हजार

असहाय्य भासले मी मज

उद्विग्न खिन्न लाचार….

 

मी उठले पूर्वेस बघितले

काळोख परतला आता

क्षितिजावर केशर लाली

तो सूर्य जागला होता….

 

सोनवर्खाच्या किरणांनी

उमलू आलेल्या कलिका

पक्ष्यांचे मंजुळ गाणे

देतात जणू ते हाका…

 

दवबिंदू पानांवरुनी

टपकले बनुनी मोती

चैतन्य भास विश्वात

उजळती अंतरी ज्योती‌..

 

दु:स्वप्न पळाले दूर

मन प्रसन्नतेने न्हाले

चहूकडून माझ्यासाठी

सोबतीस सारे आले…!!

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा